तळणी शिवारात पेठा कोहळ्याचं उत्पादन

0

मोर्शी
संजय गारपवार

तळणी शिवारात २एकर शेतात ५५ पेठा कोहळ्याचे उत्पादन

तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संत्राचे उत्पादन घेत असले तरी अनेक शेतकरी पारंपारिक पिके घेता नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेती सोबत तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेती करीत आहे.अशीच गाथा तळणी शेत शिवारात द्वारका हायटेक नर्सरीचे संचालक प्रयोगशील शेतकरी प्रफुल हेलोडे यांची आहे. प्रफुल यांनी दोन एकर शेती मकत्यांनी घेऊन दहा फूट अंतरावर बेड वाफे तयार करण्यात आले होते.कर्नाटकातील बंगलोर येथून पेठा कोहळ्याचे बियाणे आणून नर्सरीत रोपटे तयार करून बेड वाफ्यावर लागवड केली होती. एक एकर जागेवर साधारणपणे ३हजार५०० याप्रमाणे दोन एकरावर ७ हजार रोपंची सप्टेंबर महिन्यात लागवड केली होती.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेठा कोहळ्याची परिपूर्ण वाढ झाली असून दोन एकर परिसरात ५५ टन उत्पादन घेतले. पेठा कोहळे हे हल्दीराम कंपनीला दहा रुपये प्रति किलोने विक्री केली असून अवगत तीन महिन्यात पाच लाख रुपयाची विक्रमी उत्पादन घेतले. युवा प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल हेलोडे यांनी व्हेटर्नरी सायन्स विभागाचे पदवीधर असून त्यांनी मोर्शी कृषी विभागात ९ वर्ष नोकरी सुद्धा केली होती. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी कृषी विभागातील नोकरीचा राजीनामा देऊन शेती करीत आहे. द्वारका हायटेक नर्सरी येथे प्रफुल हेलोडे टमाटर ,मिरची ,कोबी, ब्रोकोली , कोबी इत्यादी पिकाचे नर्सरीत रोपटे तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना विक्री सुद्धा करतो. राज्याच्या कृषी मंत्रालयाच्या वतीने प्रयोगशील शेतकरी प्रफुल हेलोडे यांची उद्यान पंडित पुरस्कार देऊन सन२०१८मध्ये गौरव सुद्धा करण्यात आला होता.