

नागपूर,(Nagpur):- ब्राझील (Brazil), रशिया (Russia), भारत (India), चीन (China), दक्षिण आफ्रिका (South Africa), इराण (Iran), इजिप्त (Egypt), इथिओपिया (Ethiopia), युएई (UAE) आणि इंडोनेशिया (Indonesia) या ब्रिक्स+ देशांनी आपापसातील आर्थिक विकास आणि राजकीय स्थैर्यासाठी स्थापन केलेल्या ‘ब्रिक्स+ CCI’ (ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) या संस्थेचे अध्यक्ष श्री. हरवंश चावला यांनी नागपूरच्या प्रियंका शक्ती ठाकुर यांची मानद सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BRICS Chamber of Commerce and Industry) ही संस्था या मैत्रीपूर्ण राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्याचा एक प्रेरणादायी स्रोत म्हणून कार्य करते. विविध उपक्रम, मंच आणि नेटवर्किंग मधून व्यवसाय फुलवणे, नवोन्मेष करणे आणि विस्तार साधणे यासाठी हे व्यासपीठ आहे. जागतिक आर्थिक घडामोडींच्या गुंतागुंतीचा वेध घेणे आणि ब्रिक्स देशांमधील सहकार्य वाढवणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नाट्य, टीव्ही आणि चित्रपट या विविध माध्यमांतून गेल्या 18 वर्षांपासून कार्यरत असलेल्या ख्यातनाम रंगकर्मी, अभिनेत्री, दिग्दर्शिका व निर्माती प्रियंका ठाकूर यांना 2023 सालचा संगीत नाटक अकादमीचा मानाचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार(Ustad Bismillah Khan Youth Award) प्राप्त झाला आहे.
नव्या पिढीची नवदृष्टी, अनुभव आणि कौशल्य संस्थेसाठी मोलाची असल्याचे मान्य करून वाणिज्य, व्यवस्थापन आणि महानाट्य लेखन-दिग्दर्शन या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या सौ. प्रियंका शक्ति ठाकुर यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. ही बाब केवळ नागपूरसाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भ व महाराष्ट्रासाठी गौरवाची आहे.
Brics chamber of commerce and industry president
Brics chamber of commerce and industry members
BRICS CCI Young Leaders
BRICS headquarters
BRICS official website
Brics cci membership
Ustad Bismillah Khan Yuva Puraskar list
Bismillah Khan Yuva Puraskar application
Ustad Bismillah Khan award started in which year
Ustad Bismillah Khan Yuva Puraskar 2025