

लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रियदर्शिनी स्पोर्ट्स मीट : 24-25’ चे उद्घाटन सोमवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होत आहे. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश चतुर्वेदी व सचिव आभा चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या मैदानावर होत असलेल्या या स्पोर्ट्स मीटमध्ये संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, समिती सदस्य, प्राध्यापक यांचा सहभाग राहील. बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, अॅथेलेटीक्स, व्हॉलिबॉल, क्रिकेट अशा विविध क्रीडा स्पर्धां तसेच, संगीत खुर्ची, नृत्य, गायन, फोटोग्राफी, ड्रॉइंग, रांगोळी आदी स्पर्धा अशा एकुण 15 स्पर्धा होणार असून त्यात सुमारे 1700 शिक्षक व शिक्षकेतर खेळाडू सहभागी होत आहेत. स्पोर्ट्स मीटचा समारोप व बक्षिस वितरण सोहळा 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. बी. दातारकर, उपाध्यक्ष समीर चिटणीस आणि मुख्य संयोजक मनोज अंबाडकर प्रयत्नरत आहेत.