नटराज आर्ट सेंटर येथे प्रिंट मेकिंग कम्‍युनिटी स्टुडिओचे थाटात उद्घाटन

0

(Nagpur)नागपूर, 21 मार्च
धरमपेठ एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित नटराज आर्ट अ‍ॅण्ड कल्चर सेंटर येथे ‘प्रिंट मेकिंग स्टुडिओ’ चे उद्घाटन मुंडले एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त निखिल मुंडले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
रजत महोत्सव बिल्डिंग, खरे टाउन, धरमपेठ येथे झालेल्‍या या कार्यक्रमाला
याप्रसंगी धरमपेठ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांच्‍यासह छापखाना ग्रुपचे संस्थापक मिलिंद लिंबेकर, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी अध्यक्ष अ‍ॅड. संजीव देशपांडे, प्रिंट मेकिंग विभागाचे प्रा. अक्षय तिवारे व नटराज आर्ट अँड कल्‍चर सेंटरचे प्राचार्य डॉ. रविंद्र हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रिंट मेकिंग स्टुडिओमध्‍ये लिथो प्रेस, इचिंग प्रेस व प्रिंटशी संबंधीत वेगवेगळ्या मशीन्स लावण्यात आलेल्या असून नागपुरातीलच नव्हे तर मध्य भारतातील कलावंतांना प्रिंट मेकिंगचे काम करता यावे, याकरिता हा कम्युनिटी स्टुडिओ म्‍हणून कार्यरत राहिल अशी माहिती डॉ. रविंद्र हरिदास यांनी दिली.
स्‍टुडिओ सुरू झाल्‍यानंतर येथे लगेच शुक्रवारी येथे इचिंग अ‍ॅण्ड कॅलिग्राफीवर आधारित कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत 20 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रिंट मेकिंग मधील कलाकौशल्य अनुभवण्याची, कलासर्जनतेला वाव मिळण्याची तसेच कलावंताना भेटण्याची सुवर्णसंधी या स्टुडिओद्वारे इच्छुकांना मिळणार आहे. अनुभवी प्रिंटमेकर्स आणि उत्सुक विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणण्यासाठी या स्टुडिओचा व कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन अॅड. उल्‍हास औरंगाबादकर यांनी केले.