
विकसित भारत संकल्प यात्रेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधला संवाद
(Buldhana)बुलढाणा – विकसित संकल्प भारत यात्रेचा रथ आज 30 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील कुलमखेड या गावात पोहचला. गावातील नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजने संदर्भात या रथयात्रेतून माहिती देण्यात आली. (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील जनतेशी दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
या संवादाचे थेट प्रक्षेपण संकल्प भारत यात्रेच्या चित्र रथातून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.