Top News : पंतप्रधान मोदींनी माय मराठीचे पांग फेडले

0
Prime Minister Modi paid off My Marathi
पंतप्रधान मोदींनी माय मराठीचे पांग फेडले

राष्टीय मराठी मोर्चाचे अध्यक्ष आनंद रेखी यांचे प्रतिपादन

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रत्येक मराठी माणसाचे स्वप्न साकारले आहे. मराठी अस्मितेची बूज राखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माय मराठीचे पांग फेडले आहेत, असे प्रतिपादन राष्टीय मराठी मोर्चाचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी आज केले.

मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन केले. गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी मराठी जनांकडून होत होती. देशात आजवर अनेक पंतप्रधान झाले. मात्र, मराठीला न्याय कोणी दिला नाही. अखेर नरेंद्र मोदींनी माय मराठीचे पांग फेडले, अशा शब्दांत रेखी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.