राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा वर्धा दौरा अखेर रद्द

0

 

 (Wardha)वर्धा – देशाच्या (President Excellency Draupadi Murmu)राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांचा दि.६ जुलै रोजी वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम होता. त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू होती, परंतु राष्ट्रपती भवनाकडून आलेल्या पत्रामुळे हा दौरा अखेर रद्द झाला आहे. राष्ट्रपती यांचा वर्धा जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील सहावा दीक्षांत समारंभ देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणार होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे हा दौरा रद्द झाल्याची अधिकृत माहिती आज (Chancellor of Vishwa Vidyalaya Prof. Rajnish Kumar Shukla)विश्व विद्यालयाचे कुलपती प्रो.रजनीश कुमार शुक्ल यांनी दिली.