

येत्या, 7 ऑगस्ट रोजी होणार सोहळा
पूर्व विदर्भातील सदस्यांची झाली बैठक
नागपूर(Nagpur),12 जुन 2024 :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेतील अग्रणी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले स्व. दत्ताजी डिडोळकर(self Dattaji Didolkar) यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. येत्या 7 ऑगस्ट 2024 रोजी जन्मशताब्दीच्या समारोपाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या तयारीचा आढावा घेण्याकरीता श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समिती पूर्व विदर्भच्या सदस्यांची बैठक बुधवारी सेवासदन येथे पार पडली. बैठकीला नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आदी ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात डॉ. मुरलीधर चांदेकर, विनय माहूरकर, भूपेंद्र शहाणे, किशोर पाटील, श्रद्धा पाठक, अॅड. मनीषा कुळकर्णी, मीरा औरंगाबादकर, अनिल सांबरे, वासंती देशपांडे, विक्रमजित कलाने, अमित पटले, वर्धेचे मनोज साबळे, चंद्रपूरचे महेश श्रीरंग, जगदीश तोटावर, दिलीप घोरपडे, वामन तुर्के, श्रीकृष्ष्ण घड्याळ, पाटील बाबा बागडे, विवेक सरपटवार, गोंदियाचे वीरेंद्र अंजनकर, गडचिरोलीचे प्रा.धर्मेंद्र मुनघाटे यांचा समावेश होता.
डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी वर्षभर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेतला आणि दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्या, या उद्देशाने भविष्यात अध्यासन केंद्र, रेक्रियेमेशन सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. जन्मशताब्दी समारोपीय कार्यक्रमात दत्ताजींच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन, तसेच, शिक्षण क्षेत्रात उल्लखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जाणार असल्याचे ते म्हणाले. समारोपीय कार्यक्रमाच्या तयारीकरीता जिल्हा निहाय नियोजन समिती स्थापन करण्यात आल्या असून विदर्भात वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने बैठका व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचे संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे.