नागपुरातील खासदार महोत्सवाची तारीख जाहीर, यंदाचे वैशिष्ट्य काय?

0

कार्यालयाचे उदघाटन व भूमीपूजन 28 नोव्‍हेंबर रोजी
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव (MP Cultural Festival) समिती, नागपूरच्‍यावतीने येत्‍या, 13 ते 22 डिसेंबर दरम्‍यान हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर ‘खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव – 2024’ आयोजित करण्‍यात आला आहे. रंगारंग सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी परिपूर्ण अशा या महोत्‍सवाच्‍या तयारीला आता वेग आला आहे. (Khasdar Sanscrutik Mahotsav)

महोत्‍सवाच्‍या कार्यालयाचे उदघाटन व भूमीपूजन गुरुवार, 28 नोव्‍हेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर माजी खा. अजय संचेती, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रा. अतुल मोघे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी व इतर सदस्यांनी केले आहे.