67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण

0

67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी चंद्रपूर शहरालगतच्या बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धा आयोजनासाठी चंद्रपूर व बल्लारपूर शहरं नववधूप्रमाणे सजली आहेत. आज संध्याकाळी 5.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीद्वय यांच्या हस्ते स्पर्धेचे रीतसर उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंच्या निवास व भोजन व्यवस्थेसाठी काटेकोर उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरातून सध्या सुमारे 3 हजार खेळाडू यासाठी स्पर्धा स्थळी दाखल झाले आहेत. आज मोठ्या संख्येत क्रीडापटूंनी अत्याधुनिक स्टेडियमवर सराव केला. चंद्रपुरात सध्या बोचरी थंडी असल्याने विविध राज्यातून आलेले खेळाडू या वातावरणाशी समरस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 31 डिसेंबर पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेच्या अतिशय उत्कृष्ट व नेटक्या आयोजनासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नागपूर-चंद्रपूर जिल्हा दौरा

-बल्लारपूर येथील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे करणार उद्घाटन

नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  दि. 27 डिसेंबर रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. बल्लापूर येथे होणा-या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहेत.
उद्या दुपारी 4 वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॅाप्टरने मोरवा विमानतळ, जि.चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता मोरवा विमानतळ येथे आगमन व मोटारीने वन अकादमी चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता वन अकादमी चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायं. 5.15 वाजता वन अकादमी येथून मोटारीने तालुका क्रीडा संकुल बल्लापूरकडे प्रयाण. सायं. 5.30 वाजता राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन. सायं. 6.30 वाजता बल्लापूर येथून मोटारीने नागपूकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.