जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

0

 

नागपूर NAGPUR  – नागपूर जिल्ह्यातील  NAGPUR JILHA रविवारी 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये ३६१ गटग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठीची संपुर्ण तयारी झाली आहे. यामध्ये मतपेट्या व सर्व बाबी प्रशिक्षित कर्मचारी तपासून पाहत आहेत. या मधील EVM मशिन तपासणी, मतदान यादी तपासणी आणि बाकी सर्व प्रक्रिया पूर्ण करून सर्व मतदान पेट्या पोलीस बंदोबस्तात आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहेत. यानंतर उद्या रविवारी सकाळी 7.30 पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. सायंकाळी 5.30 ला संपणार आहे. यानंतर सोमवारी या मिनी विधानसभा निवडणूक समजल्या जाणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीतील निवडणुकीचा निकाल लागणार आहे.