‘टेक-नेक्स्ट’ च्‍या अध्‍यक्षपदी प्रवीण पंचभाई नवीन कार्यकारी समितीची घोषणा

0

नागपूर (Nagpur), 7 एप्रिल
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील शैक्षणिक आणि जिज्ञासू लोकांसाठी २०२० साली स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या ‘टेक-नेक्स्ट असोसिएशन’च्या तिसऱ्या कार्यकारी समितीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षस्‍थानी प्रवीण पंचभाई यांची निवड करण्‍यात आली.

मावळते अध्यक्ष अभिनय ढोबळे यांच्याकडून प्रवीण पंचभाई यांनी एक वर्षाकरिता पदभार स्वीकारला. सह-अध्यक्ष आशिष अडबे, सचिव हेमंत झुंझुरकर, कोषाध्यक्ष नरेश वसू तर सदस्‍य म्‍हणून महेंद्र गिरीधर, रोहित दुजारी, सुधीर लातूरकर, अनुप केळकर, हरीश जिभकाटे हे कामकाज पाहतील.

टेक-नेक्स्टद्वारे वर्षभर विविध तांत्रिक विषयांवर चर्चासत्रे, कार्यशाळा, औद्योगिक भेटी, शैक्षणिक प्रशिक्षण, स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत व्यक्ती टेक-नेक्‍स्‍टच्‍या व्‍यासपीठावर येतात आणि त्यांच्‍या क्षेत्रातील नवोपक्रम व शोधांबद्दलचे ज्ञान आणि अनुभव सांगून मार्गदर्शन करतात.

टेक-नेक्स्टने मागील तीन वर्षात ११० हून अधिक सत्रांचे आयोजन केले असून ही सत्रे दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सायंकाळी ७ वाजता चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे होतात. सर्वांसाठी ही सत्र खुल असून सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रेमी, विद्यार्थी, व्यावसायिक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ असोसिएशनचे सदस्य होऊन त्‍यांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन टेक-नेक्स्ट असोसिएशनचे सहसंस्थापक व माजी अध्यक्ष डॉ. विशाल लिचडे यांनी केले आहे.