

नागपूर (NAGPUR)
एकलव्य एकल विदयालयाचे अविरत कार्य करणारे केशव माधव शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत बोपर्डीकर यांना केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी कै.. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे दिला जाणारा ‘कर्मयोगी द्राणाचार्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला सिनेअभिनेता सुनील शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशांत बोपर्डीकर हे केशव माधव शिक्षण संस्थेचे सचिव या नात्याने सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथमिक व माध्यमिक, (प्रसाद नागर जयताळा रोड, नागपूर) कार्य सांभाळत असून नितिन गडकरी यांच्या प्रेरणेने कै.. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारा संचालित एकलव्य एकल विद्यालयांचे कार्य करीत आहेत. विदर्भातील गडचिरोली, चंदपूर, मेळघाट, गोंदिया अशा बऱ्याच दुर्गम भागातील विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाच्या दिशेने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे कार्य एकलव्य एकल विद्यालयाद्वारे केले जाते. सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथामिक माध्यामिक शाळेतर्फे बुधवारी त्यांचा मा. श्री. शिरीष भुते यांच्या हस्ते शाल, व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर वैशाली बोपर्डीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुल भुते, माध्यामिकचे मुख्याध्यापक राहूल गाडगे यांची उपस्थिती होती. शाळेचे शिक्षकवृंद व विदयार्थी यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन झोड मॅडम यांनी केले, मृदुल भुते यांनी आभार मानले.