
मुंबई MUMBAI : इंडिया आघाडीत India Aghadi आपल्या अटींवर सहभागी होण्यासाठी प्रयत्नात असलेल्या वंचित बहुजन आघाडीने आता थेट काँग्रेसवर दबाव निर्माण करणे सुरु केेले आहे. वंचित बहुजन आघाडीचे Prakash Ambedkar अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना मुस्लिम समाजाला केलेल्या आवाहनामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली असून आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
प्रकाश आंबेडकरांना मुस्लिम समुदायाला काँग्रेसपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. रिसोड शहरात मुस्लिम संवाद सभेत आंबेडकरांनी हे आवाहन केले.
जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने आंबेडकर अवस्थ झाले असल्याचे मानले जात आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेसवर दबाव निर्माण करणे सुरु केल्याचे मानले जात आहे. आंबेडकर म्हणाले, आगामी १५ दिवसत त्यांनी जागावाटपाचा निर्णय घेतला तर ते वाचतील अन्यथा त्यांचे हालही इंडिया आघाडीसारखे होतील, असा इशाराही त्यांनी दिलाय. इंडिया आघाडीचे रिंग मास्टर पंतप्रधान मोदी हेच आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आज होत असलेल्या बैठकीचे वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण मिळाले आहे. या बैठकीपूर्वीच आंबेडकरांना दबावतंत्राचा वापर सुरु केलाय. आंबेडकर यांनी अलिकडेच महाविकास आघाडीत वंचित आघाडीसह चारही पक्षांनी प्रत्येकी १२ जागा लढविण्याचा फॉर्म्युला मांडला आहे. मात्र, त्यांच्या या फॉर्म्युलाला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षांनी प्रतिसाद दिलेला नाही.