अमरावती AMRAWATI – निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. सहा महिन्यांत निवडणूक घेतल्या पाहिजे. निवडणूक आयोग कायद्याने वागत नाही. सरकारच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार ऍड Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
खरेतर निवडणूक आयोग निःपक्षपाती राहला पाहिजे. कारवाईच्या भीतीपोटी आज राजकीय पक्ष आपली भूमिका घ्यायला घाबरत आहेत.खरेतर व्यवस्थेशी राजकीय पक्षाने इमानदार राहिले पाहिजे. मुंबई हायकोर्टाने निवडणूक घ्यायचे सांगितलं तरी निवडणूक घेत नाही. एकतर राजीनामा द्या किंवा निवडणूक घ्या.
नियमाने निवडणूक आयोगाला त्याचा पूर्ण वेळ झाल्याशिवाय काढता येत नाही.निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की, तुमची वागणूक जनेतेच्या विरोधात आहे.लोकांनी जर उठाव केला तर तुम्ही जबाबदार आहे. जनता ही देशाची मालक आहे. राणांचा अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये घुमजाव सुरू आहे कधी म्हणतात की, भाजप आम्हाला पाठिंबा देईल कधी म्हणतात की राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देईल. मात्र,नवनीत राणा सहा महिन्यात जेल मध्ये दिसतील असा दावा आंबेडकर यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला वेटींग वर ठेवत आहे.आमची भूमिका भाजप विरोधी आहे. काँग्रेसची भूमिका ही दुतोंडी आहे असा आरोप केला.













