प्रदीपकुमार नागपुरकर यांचा प्राकृतिक विकास तथा स्वदेशी कार्यासाठी सन्मान

0
प्रदीपकुमार नागपुरकर यांचा प्राकृतिक विकास तथा स्वदेशी कार्यासाठी सन्मान
pradeep-kumar-nagpurkar-honored-for-natural-development-and-indigenous-work

 

हिंगणघाट (Hinganghat) :- 
राष्ट्रीय कृषि पत्रकार संघ द्वारा, हँलिपँड प्रदर्शन परिसर सेक्टर नं. 12 अहमदाबाद येथे आयोजित “राष्ट्रीय प्राकृतिक, कृषि, स्वदेशी वस्तु तथा पत्रकार पुरस्कार” समारोह 2024 चे वितरण समारंभ गुजरात राज्याचे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रतजी, यांचे हस्ते हिंगणघाट येथील अभिनव स्वदेशी वस्तु केन्द्राचे संचालक तथा राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव, भारतीय युवा संस्कार परीषदेचे संस्थापक प्रदीपकुमार नागपुरकर यांना प्राकृतिक विकासात्मक तथा स्वदेशी साहित्याचे प्रचारार्थ तीन दशकापासून सातत्यमय कार्य करण्यासाठी राष्ट्रीय स्वदेशी प्राकृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र शासनाचे कृषि मित्र पुरस्कार प्राप्त मानकरी तथा राष्ट्रीय कृषि पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन गिरोलकर, गुजरात राज्य कृषि आयोग चेयरमैन डाँ. भरतभाई पटेल,अनाज इंडिया चेयन कमेटी अध्यक्ष विजय हुसूकले, जैन ऐरिगेशनचे मार्किटींग प्रमुख जयकुमार ठक्कर, आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील तीन दशकाहून अधिक कालखंडापासून प्रदीपकुमार नागपुरकर सामाजिक दायित्व सांभाळत समर्पित भावनेने युवा मध्ये रचनात्मक कार्य करीत स्वदेशी साहित्याचे प्रचारक तथा देशपातळी प्राकृतिक विकासाचे कार्यासाठी कार्यरत असून पत्रकारिता युवा संस्कार मासिकाचे संपादनासह विद्यार्थी वर्गासाठी 40 वर्षापासून हस्ताक्षर सुधार शिबीराचे माध्यमातून लाखो विद्यार्थी बंधू-भगिनींचे हस्ताक्षर सुधार करणारे युवा-संस्कार मासिकाचे संपादक प्रदीपकुमार नागपुरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांना विविध रचनात्मक गतिविधि करीता हा सन्मान प्रदान करण्यात आला. निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची ही पावती म्हणजे हा सन्मान असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले.

हा सन्मान मिळाल्याबद्दल भा.यु.सं.प.केन्द्रीयध्यक्ष डाँ.प्रा. शरद कुहीकर, डाँ. शरद मद्दलवार,वासुदेवराव गौळकार,प्राचार्य मंजुषा सागर, निसर्ग साहित्यिक शरद शहारे, भिमसागर खैरकर,अँड. विजय ढेकले, अँड. रविन्द्र मद्दलवार, सुशांत बाराहाते, विजय डेकाटे, नरेंद्र हाडके, अविनाश आईटलावार, रामभाऊ मेंढे, अमोल भोंमले, चेतन काळे, सचिन महाजन, नरेन्द्र पोहनकर, तारामावशी बगमारे, योगीराज कोहचाडे,पुनम ढगे, चेतना सातपुते, प्रिया भोंमले, निलीमा मोहमारे यासह शिक्षण, सामाजिक, स्वदेशी क्षेत्रातील संबंधित व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले.

Places to visit in hinganghat
Hinganghat map
Hinganghat distance
Hinganghat is famous for
Hinganghat population 2024
Hinganghat to Nagpur
Hinganghat area
Hinganghat Taluka village list