

धर्मभास्कर श्री सद्गुरूदास महाराज यांना त्यांच्या ६१ वर्षांतील धर्म, संस्कृती, इतिहास क्षेत्रातील भरीव समाज प्रबोधन कार्याच्या गौरवार्थ ‘प्रबोधरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक उत्सव समिती दिल्ली, महाराष्ट्र मंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव समिती गुरुग्राम (हरियाणा) यांच्या वतीने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
रविवार, 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता चिन्मय गुरुधाम, गुरूग्राम (हरियाणा) येथे चेतन शेलोटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होईल. याप्रसंगी ”पत्रभेट” मासिकाच्या अष्टलक्ष्मी दिवाळी अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. तसेच, सद्गुरुदास महाराजांचे वैदिक श्रीसुक्तावर प्रवचन होईल.
या आनंद सोहळ्यात सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन नीना हेजीब, जीवन तळेगावकर, विष्णू पाटील, शांताराम उदागे, डॉ. रेवती देशपांडे, प्रज्ञा फडणीस व सुजित देशपांडे यांनी केले आहे.