
नागपूर, दि. 2 नोव्हेंबर 2025 :बगडगंज येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये वीज खांबांच्या अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे सोमवारी, दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत वीज पुरवठा खंडित राहणार आहे.
यामुळे जुनी मंगळवारी, अश्विपर कॉलनी, हत्ती नाला, चंद्रशेखर आझाद चौक, शिवाजी नगर , भूतेश्वर नगर, नंदाजी नगर, चिटणीस पुरा, जयशंकर अपार्टमेंट, ७ स्टार हॉस्पिटल, गरोबा मैदान, बगडगंज, माटे चौक, कापसे चौक, छापरु नगर, सेंट्रल एव्हेन्यू रोड मार्केट शोरूम परिसर, टीव्हीएस शोरूम परिसर, स्वीपर कॉलनी, गंगाबाई घाट, मंगळवारी, मानापुरा चौक , खिरनी हनुमान मंदिर, नवाबपुरा, लाकडीपूल या भागातील वीजपुरवठा बंद राहील
वीज पुरवठा सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे, संबंधित भागातील नागरिकांनी या वेळेत महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.


















