
नागपूर-राज्यातील सातही औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये (Thermal Power Station) क्षमतेपेक्षा पन्नास टक्के कमीच वीज निर्मिती होत असल्याने राज्यापुढील वीजेचे संकट वाढण्याची शक्यात व्यक्त होत आहे. ओला कोळश्याची समस्या आणि दुरुस्तीच्या कामांमुळे राज्यातील सातही वीज केंद्रांची निर्मिती क्षमता सध्या कमी झाली आहे. मागील तीन दिवसांपासून ही परिस्थिती असून त्याचा परिणाम भारनियमात होऊ शकते, असे जाणकारांना वाटते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सात औष्णिक वीज केंद्रांची वीज निर्मिती क्षमता ९५४० मेगावॅटची असून सध्या केवळ ४७३२ मेगावॅट वीज निर्मिती शक्य होत आहे. दुरुस्तीची कामे आणि ओल्या कोळश्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. आणखी काही दिवस वीज निर्मितीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राची क्षमता सर्वाधिक २९२० मेगावॅटची असताना तेथे केवल १११४ मेगावॅट निर्मिती शक्य होत आहे. नागपुराती खापरखेडा व कोराडीत अनुक्रमे ८१९ आणि ११८४ मेगावॅट वीज निर्मिती शक्य होत आहे.