विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

0
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता
Possibility of announcement of assembly elections

 

भाजपची पहिली यादी या दिवशी येणार

येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात भाजपा सर्व राज्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी करत आहे. सर्व राज्यांत प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच काही बैठकाही झाल्या आहेत.

भाजप या महिन्याच्या अखेरीस तीन राज्यांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील ३० ते ३५ जागांवरील उमेदवार, हरियाणातील २० आणि झारखंडच्या २५ उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपाने फॉ़र्म्युला ठरविला आहे. पहिल्या यादीत अशा जागा असतील ज्या गेल्या निवडणुकीत भाजपा हरली होती किंवा कमी अंतराने जिंकली होती. या जागांवर तयारीसाठी उमेदवाराला वेळ मिळावा म्हणून पहिली यादी जाहीर केली जाण्याची रणनिती भाजपाने आखली आहे. या जागा मुख्यता एससी, एसटी आरक्षणाच्या असणार आहेत.