सीआयडी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

0

मुंबई: प्रचंड गाजलेल्या CID ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची विनोदी भूमिका साकारणारे दिनेश फडणीस यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. (Dinesh Phadnis Passed Away)
मालिकेत ‘दया’ हे पात्र साकारणाऱ्या दयानंद शेट्टी  Dayanand Shetty यांनी दिनेश फडणीस यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

दिनेश फडणीस यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात १ डिसेंबरपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना यकृताचा आजार होता. यकृत निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोनी वाहिनीवरील सीआयडी मालिका प्रदीर्घ काळ चालली. त्यातील पात्रांची आजही चर्चा होते. गुन्हेगारी प्रकरणांवर आधारित या मालिकेत इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे दिनेश फडणवीस बरेच लोकप्रिय होते. १९९८ ते २००८ अशी जवळपास दहा वर्षे त्यांनी या मालिकेत काम केले. काही चित्रपटांमध्येही त्यांनी छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या.