बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात

0

 

(Bid)बीड– मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. बीड शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीडमधील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. बीडमधील बस सेवा सुरळीत आहे.

तर अत्यावश्यक सेवा देखील सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. बंद दरम्यान बीडमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरांमध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक उपविभागीय पोलीस अधिकारी, चार पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक आणि 150 पोलीस कर्मचारी यांच्यासह बीड मधील राखीव पोलीस दल देखील वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली आहे.