

घुग्घुस: शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन मोठया उत्साहात पार पडले. गांधी चौकात पोळा, गणपती व दुर्गा उत्सव समिती घुग्घुसच्या वतीने मिरवणुकीत सहभागी सार्वजनिक गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी स्वागत मंडप लावण्यात आले होते.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी उपस्थित राहून सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षाचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
तसेच जिल्हा शांतता कमेटीचे पदाधिकारी चिन्नाजी नलभोगा, सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी, जय श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनील बाम, पोळा समितीचे अध्यक्ष प्रदीप जोगी, तान्हा पोळा समितीचे अध्यक्ष गणेश कुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ढेंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संपुर्ण घुग्घुस शहर भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने न्हाऊन निघाले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषाने घुग्घुस दुमदुमून गेले होते.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे अमोल थेरे, निरीक्षण तांड्रा, सिनु इसारप, तुलसीदास ढवस, सुरेंद्र भोंगळे, दिलीप कांबळे, प्रमोद भोस्कर, बबलू सातपुते, प्रेमलाल पारधी, वसंता भोंगळे, विवेक तिवारी, वैशाली ढवस, सुचिता लुटे, सुनीता पाटील, बेगमताई, नाजमा कुरेशी, असगर खान, विनोद जंजर्ला, सुनील राम, पियुष भोंगळे, गजानन जोगी,प्रणय मुके,मंदेश्वर पेंदोर,गौरव ठाकरे,उमेश दडमल, गणेश राजूरकर, सुरेंद्र झाडे, राकेश भेदोडकर, बंटी आगदारी, सौरभ कागदेलवार, अनुप जोगी, किरण झाडे, विक्की चिवंडे, गोलू थेरे, विक्की निब्रदड, संदीप तेलंग व मोठया संख्येत नागरीक उपस्थित होते.