विकासाच्या नावावर धारावी मोठ्या विकासकाला देण्याचा डाव- वर्षा गायकवाड

0

 

नागपूर – मोदानी हटाव, धारावी बचाव या मोहिमेअंतर्गत आज विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हाती फलक झलकावत आंदोलन करीत लक्ष वेधले.
विकासाच्या नावावर धारावी मोठ्या विकासकाला देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केला
धारावी ही धारावीकरांनी बनवलेली आहे, तिचा विकास धारावीकरच करतील.याठिकाणी मोठा टीडीआर घोटाळा झाला आहे, याला वाचा फोडण्याचं काम आम्ही करत आहोत
आ रोहित पवार यांनी संघर्ष यात्रेच्या दरम्यान शेतकरी आणि कामगारांचे युवकांचे आणि प्रश्न मांडले आहेत एक तरुण तरुणांच्या प्रश्नासाठी काम करत आहे, ज्या तऱ्हेने त्यांना विधानभवनात येताना अडवण्याचं काम झालं, हे दुर्दैवी आहे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.