पियुष भुते यांचा 26 रोजी ‘लाईव्‍ह ग‍िटार परफॉर्मन्‍स’

0

पियूष भुते यांचा ‘छाज़ एटर्निटी’ हा लाईव्‍ह गीटार परफॉर्मन्‍स बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सायंटिफिक हॉल, नागपूर येथे आयोजित करण्‍यात आला आहे. पियूष भुते यांचा हा सोलो परफॉर्मन्स राहणार असून खास महाशिवरात्रीच्‍या पर्वावर भगवान शिवाला समर्पित केला आहे.

‘रिदम्स ऑफ रुईन्‍स’ हा त्‍यांचा अल्‍बम अतिशय लोकप्रिय असून यात एंबियंट मेटल, जबरदस्त गिटार रिफ्स आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा एक अप्रतिम संगम चाहत्‍यांना अनुभवायला मिळणार आहे.

हा कार्यक्रम फक्त एक कॉन्सर्ट नाही, तर ऊर्जा, भावनांचा आणि संगीताच्या वेगळ्या प्रवाहाचा साक्षात्कार आहे. त्‍यामुळे मोठ्या संख्‍येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.