निवडणुकीत जनताचं विरोधकांचं ऑडिट करेल – एकनाथ शिंदे

0

 

मुंबई MUMBAI – येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताचं विरोधकांचं ऑडिट करेल. येणाऱ्या निवडणुकीत जनताचं उत्तर देईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. येत्या 12 जानेवारीला अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रात सभा होणार आहे. या सभास्थळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अटल सेतू हा गेम चेंजर प्रकल्प असून टाईम सेव्हिंग असल्याचे सांगितले.