परमानंद तिराणीक ‘नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित

0

परमानंद तिराणीक ‘नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित

प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते गौरव

नागपूर |आचार्य परमानंद तिराणीक यांना ‘नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार नागपूर येथील मधुराम सभागृहात आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि सुवर्णपदक असे होते. यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, “कोणताही माणूस पूर्णांक नसतो, प्रत्येकात काही ना काही अपूर्णता असते. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतरही मी समाधानी नाही, अजून पुढे जाण्याची आकांक्षा आहे. कठीण प्रसंगांमधून माणूस घडतो. म्हणून संघर्ष पचवायला शिकले पाहिजे.”

या कार्यक्रमात परमानंद तिराणीक यांचे गुरू डॉ. अनराज टिपले यांना ‘राष्ट्रीय विदर्भ जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्पर्श थेरपी सेंटर च्या संचालिका डॉ. प्रीती साव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सत्कार स्वीकारताना आपले मनोगत व्यक्त करताना आचार्य तिराणीक म्हणाले, “सत्कार हा सत्कर्माचा असतो. मी आदिवासी पार्श्वभूमीतून आलो असून संघर्ष माझ्या विचारांचा भाग आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. मी या सन्मानासाठी पात्र नसले तरी त्याच्या नावाला साजेसे कार्य करण्याचा प्रयत्न करीन.”

या सोहळ्याला मा. मोरेश्वर निस्ताने (फिल्म म्युझिक डायरेक्टर), मा. प्रकाश गायकवाड (जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर), मा. मोनिका पेटर डंटास (सामाजिक कार्यकर्त्या, मुंबई), मानसोपचार तज्ञ कोल्हापूरकर, आरोग्य अधिकारी रवींद्र दिघोरे यांच्यासह समृद्धी प्रकाशनचे संपादक व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा. डॉ. बाळकृष्ण थोरात हे उपस्थित होते.

या यशाबद्दल दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे राज्य सरचिटणीस मा. दीपक शेवाळे आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आचार्य तिराणीक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.