

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही वर्षात लंडन म्हणजेच युके येथे भव्यदिव्य स्वरूपात साकारले जाणार असून त्यानिमित्ताने १५ एप्रिलला पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघाली आहे. ही दिंडी बुधवार, 16 एप्रिल रोजी नागपुरात पोहोचत आहे.मुळचे नागपूरकर असलेले पण युकेत स्थायिक झालेले ऊद्योजक तुषार गडीकर व अनिल खेडकर यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारतोय, यापैकी अनिल खेडकर या पंढरपूर ते लंडन दिंडीचे नेतृत्व करत आहे.
संध्याकाळी ६ ते ९ या वेळाच विष्णूजी की रसोई, बजाज नगर येथे दिंडीतील पादुका सर्वांच्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहे, व प्रसाद वितरणाचा कार्यक्रम होईल अशी माहिती मंदिर समितीचे भारतातील समन्वयक विष्णू मनोहर आणि मोहन पांडे यांनी कळवले आहे.
१८ एप्रिल रोजी ही दिंडी भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करेल व पुढे चीन, रशिया, यूरोप अशा २२ देशातून ७० दिवसात १८ हजार किमी एवढा प्रवास करत कारने या पादुका लंडन येथे पोहोचणार आहेत.
नागपुरातील पादुका आगमन व दर्शन या आयोजनाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण मनोहर,मिलींद देशकर,विजय जिथे,प्रविण देशकर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.