पंढरीतील बस स्थानक प्रवाशांसाठी आषाढी यात्रेला होणार सुरू

0

पंढरपूर- विठ्ठलाच्या आषाढी यात्रेसाठी राज्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविक भक्त वारकरी येत आहेत.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पंढरीतील चंद्रभागा मैदानामध्ये सुसज्ज असे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बस स्थानक बांधले असून ते आता आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी सुरू करण्यात येत आहे.
चंद्रभागा मैदानावर बांधण्यात आलेल्या या बस स्थानकामध्ये एकूण 34 प्लॅटफॉर्म असून यामध्ये सर्व सुविधा प्रवाशांसाठी देण्यात आल्या आहेत. वाहक व चालकांसाठी सुद्धा या ठिकाणी राहण्याची, भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सोलापूर विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी दिली.