

चंद्रपूर(Chandrapur)कोरपना तालुक्यातील पालगाव व परिसरातील ग्रामस्थांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या नांदा येथील प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन छेडले आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले असून, कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचा सूर आहे.
यापूर्वी पालगाव व आसपासच्या गावातील नागरिकांनी सलग तीन दिवस आंदोलन करून कंपनीकडून पालगाव रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्याची हमी घेतली होती. कंपनी प्रशासनाने ३० मे पर्यंत रस्ता कामाला प्रारंभ करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, जून महिना संपत आला तरी काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा रस्त्यावर उतरत कंपनी विरोधात घोषणाबाजी केली.
बाईट : देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा
शंखनाद न्यूज साठी जितेंद्र मशारकर, चंद्रपूर