

नागपूर (Nagpur) दि. 04/10/2024 :- जागृत कुलदैवत आई तुळजा भवनी मातेच्या पादुका दिनांक 11 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला सकाळी 9 वाजता सीताराम भवन, रामनगर चौक, हनुमान मंदिर समोर, नागपूर येथे दर्शना करीता येणार आहेत. सर्व मातेच्या भक्ताना सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत पादुकाचे दर्शन घेता येईल.
नवरात्र उत्सवाच्या शुभमुहुर्तावर पादुका दर्शनाचे आयोजन देवता लाईफ फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे. ही सामाजिक व सेवाभावी संस्था असुन “निराधारांचा आधार” हे या संस्थेचे ब्रिदवाक्य आहे. ही संस्था गेल्या 9 वर्षापासून 12 वर्षाच्या आतील कॅन्सरग्रस्त मुलांसाठी सदैव कार्यरत असून 35 मुलांचे संगोपन करीत असून मुलाची सख्या वाढतच आहे.
सदर संस्था कॅन्सर पिडीत मुलाच्या औषध तसेच ऑपरेशनचा खर्च सुध्दा करीत असते. तरी सर्व जास्तीत जास्त मातेच्या भक्तानी पादुकांचे दर्शन घेऊन आई तुळजा भवानी मातेचा आशिर्वाद घ्यावा, असे संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोर बावणे यानी कळविले