पद्मश्री डॉ. धनंजय सगदेव यांची लोककल्याण डायग्नोस्टिक्सला सदिच्छा भेट

0
पद्मश्री डॉ. धनंजय सगदेव यांची लोककल्याण डायग्नोस्टिक्सला सदिच्छा भेट

नागपूर[Nagpur], 10 जून:- 
वायनाड येथे २५ वर्षांपासून सिकल सेल रुग्णसेवा करत असलेले नागपूरचे रहिवासी व पद्मश्री पुरस्कारविजेते डॉ. धनंजय सगदेव यांनी लोककल्याण डायग्नोस्टिक्स सेंटरला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी, लोककल्याण डायग्नोस्टिक्सचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार तुंगार यांनी “प्रोजेक्ट सुश्रुत” विषयी त्‍यांना माहिती दिली. सिकल सेल आणि थॅलेसीमिया या अनुवंशिक आजाराचे निर्मूलन करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवला जात असून आतापर्यंत ४० वर्षे वयोगटातील तब्बल ६०,००० लोकांची तपासणी व समुपदेशन करण्यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

डॉ. सगदेव यांनी अल्पावधीत मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचल्याबद्दल या उपक्रमाचे तसेच लोककल्याण डायग्नोस्टिक्सच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांची देशभर आवश्यकता असल्याचे मत त्‍यांनी व्यक्त केले.यावेळी संस्थेचे सचिव आनंदजी मुळे, कोषाध्यक्ष चंद्रशेखर मूळे, प्रकल्प प्रमुख विनय आंबुलकर, तांत्रिक सल्लागार निलेश जोशी आणि डॉ. प्रशांत अनसिंगकर यांची उपस्थिती होती.पद्मश्री अवार्ड लिस्ट

पद्मश्री अवार्ड लिस्ट 2025
पद्मश्री पुरस्कार राशि कितनी है
पद्मश्री पुरस्कार के फायदे
पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण
पद्मश्री पुरस्कार 2025
पद्मश्री पुरस्कार स्वरूप मराठी
पद्मश्री पुरस्कार कोणाला दिला जातो