Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर

0

अमरावतीत ७० हजारांवर लाडक्या बहिणींचे अर्ज झाले मंजूर

Over 70 thousand beloved sisters- applications wer
अमरावती (Amravti) 6 ऑगस्ट जिल्ह्यात आजवर ७० हजारावर लाडक्या बहिणींचे अर्ज त्यात कोणतीही त्रुटी नसल्यामुळे मंजूर करण्यात आले आहे. या योजनेची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यात सुमारे ४ लाख बहिणींनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी ५८ अर्ज खारीज, तर ५ हजार २५९ अर्ज नामंजूर करण्यात आले.

या ७० हजारावर अर्जाशिवाय अन्य अर्जावर विचार सुरू असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी दिली. या योजनेसाठी अर्ज करण्यास ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून, तत्पूर्वीच रक्षाबंधनाच्या पर्वावर लाडक्या बहिणींना योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे.Majhi Ladki Bahin Yojana

तत्पूर्वीच आपले नाव पात्र यादीत चढावे असे लाडक्या बहिणींना वाटत असल्यामुळे सध्या मनपाच्या झोन कार्यालयात अर्ज सादर करण्यास चढाओढ लागली आहे ऍपवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी मनपा अंगणवाडी सेविकांकडे आवश्यक दस्तावेज जोडून सादर करावी लागते.

सर्व दस्तावेजांची तपासणी केल्यानंतर मग अर्ज पात्र की अपात्र याबाबत निर्णय घेतला जातो. यासाठी मनपाच्या झोन क्र. २ मध्ये मुख्य कार्यालय थाटण्यात आले असून, शनिवारीही येथे कर्मचारी अर्जाची छाननी करत आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana gov in Maharashtra
Ladki bahin yojana online apply link
Ladki bahin yojana official website
Ladki bahin yojana app
Majhi ladki bahin yojana status check
Majhi ladki bahin yojana list
Majhi ladki bahin yojana list pdf
Majhi ladki bahin yojana login