
नागपूर – शेतकऱ्यांसाठी जुलमी कायदे करून त्यांना वेठीस धरणारा कायदा आणल्यानंतर आता ड्रायव्हर लोकांचं आयुष्य उध्वस्त करणारा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. या आंदोलनाला मी पूर्णतः पाठिंबा देतो. हा काळा कायदा सरकारने रद्द करावा, अशी मागणी करतो असे प्रतिपादन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
यामध्ये चालकाच्या हाताने अपघात झाल्यास दहा लाख रुपयाचा दंड आणि सात वर्षांची शिक्षा असा हा काळा कायदा आहे. या कायद्याविरोधात ड्रायव्हर ट्रक चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. देशभरात इंधनाचा तुटवडा पडतो आहे, जनजीवन विस्कळीत होत आहे, तरी पण सरकारला जाग येत नसेल तर याचं सरकारच्या नाकर्तेपणाचा हा कळस आहे. केंद्र सरकार असे जुलमी कायदे आणून जनतेला वेठीस धरण्याच काम करत आहे. जनतेवर अन्याय करत आहे.
या सर्व कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत असेल त्याला आमचा पाठिंबाच आहे.
लोकांनी आपल आंदोलन सुरू ठेवावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.