Maharashtra Metro Rail Corporation Limited : नागपूर मेट्रो गणेशोत्सव २०२४ लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन

0

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

• मेट्रोने प्रवास करा व बक्षिसे जिंका

नागपूर (Nagpur) : भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाचे आगमन सर्वत्र झाले असून नागरिक मोठ्या प्रमाणात विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देत आहे. याच अनुषंगाने महा मेट्रोच्या वतीने मेट्रो प्रवाश्यान करता गणेशोत्सव २०२४ लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज व नियमित पणे मेट्रो प्रवाश्याची संख्या वाढत असून जास्तीत जास्ती नागरिकांन पर्यंत पोहोचण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.

नागपूर शहरातील १० गणेशोत्सव मंडळ आणि मेट्रो स्टेशन या ठिकाणी लकी ड्रॉ बॉक्स ठेवण्यात आले आहेत ज्यामध्ये मेट्रो प्रवाश्यानी प्रवास केल्यानंतर त्याची मेट्रो तिकीट या बॉक्स मध्ये जमा करावयाची महत्वपूर्ण आहे कि मेट्रो प्रवासाचा कालावधी हा ४८ तासापेक्षा जास्ती नसावा. या स्पर्धेचा कालावधी १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असा आहे.

• प्रत्यक्ष तिकीट (खिडकी/तिकीट वेडींग मशीन) घेऊन प्रवास करणाऱ्यांनी तिकीटच्या मागे आपले नाव व मोबाईल क्रमांक नमूद करावा.
• महा कार्डने प्रवास करणाऱ्यांनी कागदावर महा कार्ड क्रमांक,आपले नाव व मोबाईल क्रमांक (दिनांक व वेळ सहित) नमूद करावा.
• व्हॉट्सऍप तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांनी व्हॉट्सऍप तिकीटचे प्रिंट आउंट काढून आपले नाव व मोबाईल क्रमांक नमूद करावा.
• मेट्रोऍप तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांनी मेट्रोऍप तिकीटचे प्रिंट आउंट काढून आपले नाव व मोबाईल क्रमांक नमूद करावा.

1. संती गणेशोत्सव मंडळ,चितार ओळी मेट्रो स्टेशन
2. बजरंग गणेशोत्सव मंडळ, बजरंग कॉम्प्लेक्स, रेशीमबाग
3. श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ, मोठे आयचीत मंदिर, इतवारी रोड
4. सावित्री विहार गणेशोत्सव मंडळ, (डॉमिन्स जवळ) सोमलवाडा,वर्धा रोड
5. शंकर शिवहरे,श्रीराज ट्रॅव्हल्स,राजदीप बिल्डिंग, छत्रपती मेट्रो स्टेशन समोर,वर्धा रोड
6. सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन
7. बजाज नगर सांस्कृतिक व क्रिडा मंडळ(बजाज नगर युवक गणेशोत्सव मंडळ)
8. लोकमान्य गणेशोत्सव मंडळ,जोशी लेआऊट,सुभाष नगर
9. बाल गणेश उत्सव मंडळ, ओम श्री नाग मंदिर बेली शॉप, रेल्वे कॉर्टर,बेझनबाग
10. सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळ, गुरुनानकपुरा,कामठी रोड