

नागपूर (Nagpur) १२ ऑगस्ट :- महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई, अखिल भारतीय हिंदी संस्था संघटना आणि प्रयास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे लोकप्रिय माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या स्मरणार्थ दि. बुधवार, 14 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रभाषा संकुल, बाबुराव धनवटे सभागृह, शंकर नगर, नागपूर येथे परिसंवाद व काव्यवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
समारंभाचे उद्घाटन दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, नागपूरचे कुलपती व प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हिंदी संस्था संघाचे अध्यक्ष अजय पाटील राहणार असून महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबईच्या उपाध्यक्षा व परिसंवाद निमंत्रक प्रियंका शक्ती ठाकूर यांची उपस्थिती राहील.
यावेळी मान्यवर नाट्य कलावंत आणि कवींना ‘नाटक-काव्य-गौरव अटल सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. त्यात ज्येष्ठ रंगकर्मी नरेश गाडेकर, संजय भाकरे, प्रख्यात कवी व गीतकार दयाशंकर तिवारी ‘मौन’, प्रख्यात कवयित्री व गीतकार सरोज व्यास, प्रख्यात कवी अविनाश बागडे, हेमलता मिश्रा ‘मानवी’ यांचा समावेश आहेत. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी व देशभक्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी, मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ.शितलप्रसाद दुबे यांनी केले आहे.