
वर्धा : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा अभियान सुरू करण्यात आले आहे.या सेवा पंधरवाडा अभियान मध्ये विविध कामे निकाली काढून सेवा अभियान राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांकरिता विविध दाखल्या करिता २२ ते २८ सप्टेंबर पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंत महाविद्यालय वर्धा येथे सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला,अधिवास प्रमाणपत्र आदी करिताशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्राचार्य जी. व्हि. ठाकरे तसेच प्राध्यापक शिरीष वानकर , विशाल पाटील तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालक सौ. मंगला रविराज घुमे सेवाग्राम, आकाश दाते वर्धा. तर्फे जाफर खान , तसेच तलाठी मीनाक्षी उईके याची उपस्थिती आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळा महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रमाणपत्रासाठी शिबिर आयोजित केले असून अधिकारी आणि कर्मचारी कामाला केल्याचे चित्र दिसून येत आहे.