रस्ता सुरक्षा कार्यक्रम रक्तदान शिबिराचे आयोजन

0

 

अमरावती- “रक्तदान करूया, प्रेमाचे नाते जोडूया” या ब्रीद वाक्यासह प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती येथे आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा कार्यक्रम 2024 अंतर्गत शालेय बस व ऑटो रिक्षा चालकांची मोफत नेत्र आणि आरोग्य तपासणी, चष्मे वाटप रक्तदान शिबीर देखील घेण्यात आले. 2 ते 3 फेब्रवारी पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी केले आहे.