
गोंदिया GONDIYA – गोंदिया जिल्ह्यात सध्या गरबा उत्सव मोठ्या प्रमाणावर खेळला जात आहे. महिला आणि पुरुष गरबा खेळण्यांमध्ये अनेक मंडळात सहभागी असतात. गरबा गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भगात सुरू आहे. असंच एक मंडळ दरवर्षी नवीन सामाजिक संदेश देत गरबा उत्सवाचे आयोजन करतो. युवा पर्व सुपर वुमन बिग बास्केट गोंदिया यांच्या माध्यमातून दरवर्षी पाच दिवस गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या गरबा उत्सवामध्ये दरवेळी मोठ्या प्रमाणावर सामाजिक संदेश देण्यात येतो. यावर्षी या मंडळाद्वारे माझी वसुंधरा हा संदेश देण्यात आला आहे. यामध्ये आकाश , भूमी , जल , वायू ,अग्नी यांच कशा प्रकारे संरक्षण करून आपण वसुंधरा टिकवली पाहिजे, असा संदेश या गरबा उत्सवाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात त्या अपघाताला रोखण्यासाठी एक सुंदर असं मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. गरबा पाहण्यासाठी येथे असलेल्या नागरिकांना आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर हा सामाजिक संदेश देण्याचे काम या मंडळाद्वारे करण्यात येते. जवळपास 300 महिला या उत्सवांमध्ये गरबा खेळण्याचा आनंद लुटत असतात यामध्ये पाहणाऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.