

माजी आमदार ॲड. विजयराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
वाशिम (Washim):- नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन वाशिमच्या जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी श्री तुळशीरामजी जाधव कला विज्ञान महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत केले. या कार्यशाळेचे आयोजन माजी आमदार ॲड. विजयराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांना आधुनिक विचारांची कास धरण्याचे आवाहन केले.
माजी आमदार ॲड. विजयराव जाधव यांनी युवकांना कठोर परिश्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी वाशिम जिल्ह्यातील तरुणांनी स्पर्धात्मक युगात यश मिळविण्यासाठी केलेल्या कष्टांचे कौतुक केले.
कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून (The Unique Academy) पुणे येथील मा. श्री. देवदत्त जाधवर आणि मा. श्री. केतनकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. सुभाष जाधव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यशाळेचे यश विद्यार्थ्यांच्या सहभागाला दिले.