विदर्भ साहित्य संघाचे २९ जून रोजी आयोजन

0

नागपूर(Nagpur) २६ जून :- देशाची संस्कृती आणि कलाविश्व यांच्या संशोधनात प्राचीन शिल्पकला जशी सहाय्यक असते तसेच तत्कालीन शिलालेखही महत्त्वाचे असतात.विदर्भ साहित्य संघ आणि सर्जना निर्माण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या चित्र -शिल्प रसग्रहण व्याख्यानमालेत ‘प्रस्तर पालवी ‘ या शीर्षकाखाली शिलालेखांवर तीन लघुव्याख्यानांचे आयोजन केले आहे.या व्याख्यानमालेचे हे २३वे पुष्प आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाच्या चौथ्या मजल्यावरील अमेय दालनात शनिवार ,दिनांक २९ जून रोजी सायंकाळी ६.१५ वाजता ही व्याख्याने होतील. इतिहासाचे अभ्यासक प्रवीण योगी ‘रायगडावरील जगदीश्वर मंदिर शिलालेख ‘या विषयावर बोलतील तर, भारत विद्या अभ्यासक डॉ. शेषशयन देशमुख ‘ नागपुरातील चिकमारा शिलालेख ‘या विषयावर विचार मांडतील. कला इतिहासाचे प्राध्यापक चंद्रकांत चन्ने ‘ अलिबाग येथील आक्षी शिलालेख ‘ या विषयावर बोलतील.रसिक नागरिकांनी या कार्यक्रमास अगत्याने यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.