

ॲड. निकम यांच्याविरुद्ध खोटे आरोप, वडेट्टीवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या!
* भाजपाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई, ६ मे (Mumbai) : “26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर रा. स्व. संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले,” असा निखालस खोटा आरोप केल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Order file case wadettivar false allegations Nikam BJP CEC
प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे कायदा विभागाचे संयोजक ॲड.अखिलेश चौबे यांनीही मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
भारतीय जनता पार्टीने दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यासंदर्भात ॲड.उज्ज्वल निकम यांच्या विरोधात अत्यंत खोटे, बदनामीकारक आरोप केले आहेत. त्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात आपल्या प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या असंख्य योद्ध्यांच्या बलिदानाचीही वडेट्टीवार यांनी क्रूर थट्टा केली आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांमुळे ॲड.उज्ज्वल निकम यांची बदनामी झाली आहे. त्याच बरोबर निवडणूक आचारसंहितेचेही उल्लंघन झाले आहे. वडेट्टीवार यांच्या विधानाबाबत काँग्रेस पक्षाकडून अद्याप कसलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. याचा अर्थ काँग्रेस पक्षाची वडेट्टीवार यांच्या आरोपांना संमती आहे,असे दिसते. वडेट्टीवार यांच्या विधानांमुळे भारतीय दंड संहितेतील देशद्रोहासंदर्भातील कलम 124 अ आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 123 (4) चे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांना बिनशर्त माफी मागण्याचे आदेश द्यावेत, श्री .वडेट्टीवार आणि काँग्रेस पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, निवडणुकीच्या उर्वरीत कालावधीत वडेट्टीवार यांना प्रचार करण्यास बंदी करावी आदी मागण्याही भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत.
Order file case wadettivar false allegations Nikam BJP CEC
भाजपा प्रदेश कायदा विभागाचे संयोजक ॲड. अखिलेश चौबे यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध धार्मिक वैमनस्य निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
प्रचारासाठी आलेला गोविंदा उमेदवाराचे नावच विसरला
मावळच्या इंटरेस्टिंग घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल
मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान एक इंटरेस्टिंग घटना घडली आहे. महायुतीचे स्टार प्रचारक अभिनेता गोविंदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आला होता. यावेळी बोलतांना अचानक तो कोणाच्या प्रचारासाठी आला हेच विसरला. अखेर भाजप आमदार उमा खापरे यांना त्यांना श्रीरंग बारणे यांचे नाव सांगावे लागले. घडलेल्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चा रंगल्या आहेत.
————
टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी
येत्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सामने
येत्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा होणार आहे. यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची नावेही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी उत्तर पाकिस्तानकडून मिळाली आहे. अधिक माहिती अशी की, प्रो इस्लामिक स्टेटने क्रीडा स्पर्धांदरम्यान हल्ले करण्याची योजना आखली आहे. आयएस खोरासानच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याने अनेक देशांमध्ये हल्ले करण्याबाबत म्हटले आहे आणि समर्थकांना यामध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.
————
‘अप्सरा’ १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात
चंद्रकांत पवार यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन
प्रेम, राजकारण, अॅक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी “अप्सरा” या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, अप्सरा हा चित्रपट येत्या १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.
————
उज्वल निकम यांच्याविरुद्ध खोटे आरोप
वडेट्टीवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या!
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर रा. स्व. संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले,” असा निखालस खोटा आरोप केल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे कायदा विभागाचे संयोजक ॲड.अखिलेश चौबे यांनीही मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
————