संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्यापासून वंचित

0

 

अमरावती – अमरावती जिल्ह्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची गळती झाली व विविध रोगाने संत्र्यांचे नुकसान झाले. यावेळी 2 हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी 13 हजार 333 रुपये हेक्टरी पीक विमा काढला. मात्र, शेतकऱ्यांना 6 कोटी 46 लाख रुपयांचा फळ पीक विमा कंपनीने अद्यापही दिला नाही. यावेळी विमा कंपनीने हवामान विभागाच्या आकडेवारीवर आक्षेप घेतला होता. तर यावेळी जिल्हा कृषी विभागाने देखील हात झटकले असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पीक विमा पासून अद्याप वंचित आहेत. यावेळी सुद्धा संत्र्यांचं मोठं नुकसान झालं आहे.