नागपूर जिल्ह्यासाठी आज-उद्यासाठी ऑरेंज अलर्ट

0

 

(Nagpur)नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता आज दिनांक 28 नोव्हेंबरसाठी दिलेला असून बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसासह, गारपीट, वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. 29 व 30 नोव्हेंबर या कालावधीकरिता यलो दिलेला असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वीज गर्जना होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे तापमान देखील मोठ्याप्रमाणात घट होऊन वातावरणात थंडावा निर्माण होणार आहे. या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये. नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.