या जिल्ह्यांत आजही मुसळधार पावसाचा अंदाज

0

(Nagpur)नागपूर : हवामान खात्याने (Chandrapur)चंद्रपूर, (Gadchiroli)गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला असल्याने आजही या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काल या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. विदर्भातील इतर जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचे संकेत आहेत.
मागील काही दिवसात विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. तर मागील ४८ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यात गडचिरोली आणि चंद्रपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यांच्या काही भागात पुरस्थिती निर्माण झाली. मागील आठवडाभरात विदर्भात विविध घटनांमध्ये वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला तर भिंत पडल्याने एकाला प्राण गमवावे लागले. अकोला येथे दोन व्यक्ती पाण्यात वाहून गेल्या असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नसल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.