
(mumbai)मुंबई- विधिमंडळाचे नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर दरम्यान आयोजित होणार असल्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्यावर (Assembly Opposition Leader Vijay Wadettiwar)विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कामकाजाच्या अल्प कालावधीवर नाराजी व्यक्त केली. (Leader of Opposition on Assembly Session time period)
सध्याच्या नियोजनानुसार कामकाज दिवस केवळ १० दिवसांचे होणार आहे. आम्ही किमान तीन आठवडे तरी नागपुरात अधिवेशन चालावे, असी मागणी केली होती. महाराष्ट्रात अनेक महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर आम्हाला चर्चा करायची होती. शेतकरी संकटात आहे, बेरोजगारी, रुग्णालये आदींचे प्रश्न आहेत. राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चर्चा करायची होती. विविध प्रश्नासाठी शसकीय, अशासकीय कामकाज, विनियोजन बिल, अंतिम आठवडा आणि पुरवण्यावर चर्चेसाठी दहा दिवस अपुरा कालावधी आहे. आम्ही तीन आठवड्याचा आग्रह धरला होता. पण या सरकारने त्यातून पळ काढला आहे. आता १० दिवसांचेच कामकाज ठरवले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.