पाठीमागून नव्हे समोर येत विरोध करा – खा अनिल बोंडे

0

 

अमरावती AMRAWATI  – अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील रविराज देशमुख यांच्या वतीने शंकर पटाचे आयोजन करण्यात आले. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे  Anil Bonde हे शंकरपट पाहण्यासाठी आले असताना त्यांच्यावर दगडफेक झाली. या संदर्भात राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोंडे म्हणाले की, पाठीमागून काही जणांनी काल तिवसा याठिकाणी मी शंकरपट पाहत असतांना चार-पाच दगडं फेकून मारले. यातला एक दगड मला माझ्या खांद्यावर लागला. जर तोच दगड मानेवर लागला असता तर मोठी इजा झाली असती. पण फक्त खांद्यावर दगड लागल्याने दुखापत झाली. पाठीमागून हल्ला करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. जो कोणी असेल त्यानी समोर आलं पाहिजे. याप्रकरणी तिवसा पोलिसात तक्रार दिली असून निश्चितचं पोलीस तपास करत हल्ला करणाऱ्याला पकडतील, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे.