

Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2024 : जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीच्या तयारीला लागावे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वाट न पाहता भरतीच्या तयारी लागावे. विशेष म्हणजे एका मोठ्या महानगरपालिकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे थेट उमेदवाराची निवड ही मुलाखतीमधून होणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे देण्याचे अजिबातच टेन्शन उमेदवारांना नसणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती.
ही भरती प्रक्रिया नागपूर महानगरपालिकेकडून घेतली जातंय. थेट नागपूर महापालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून शिक्षकांची विविध पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेतून शिक्षकाची 44 पदे ही भरली जातील. क्रीडा शिक्षक आणि संगीत शिक्षकाची पद भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी वयाच्या अटीसोबतच शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. 45 ते 65 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. हेच नाही तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची पदेही भरली जातील. 30 सप्टेंबर 2024 रोजी क्रीडा शिक्षक आणि संगीत शिक्षक पदासाठी मुलाखती होतील.
26 आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी बाकी शिक्षण पदांसाठी मुलाखती होतील. भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला http://www.nmcnagpur.gov.in या साईटवर मिळेल. https://nmcnagpur.gov.in/assets/300/2024/09/mediafiles/3.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचण्यास मिळेल.