

Operation Sindoor: भारताने पाकिस्तानाला दाखवली लायकी… सिंधूपासून सिंदूरपर्यंत…, पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे महत्त्वाचे 15 निर्णय, पाकिस्तानचा थरकाप उडाला, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऑपरेशन सिंदूरची चर्चा…
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 15 दिवसांत पाकिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. भारताने केलेली कारवाई पाकिस्तानला महागात पडली आहे. सिंधू पाणी करारापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत, भारताच्या 15 कारवायांमुळे पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे. पाणी करार मोडल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट आलं. एवढंच नाहीतर, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानला त्याची लायकी दाखवून दिली आहे.22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे.
भारताकडून घेण्यात आलेले 15 महत्त्वाचे निर्णय…
1. भारताने सिंधू पाणी करार मोडला आहे. हा करार मोडल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट निर्माण झालं आहे. पाकिस्तानातील 17 कोटी लोकांना सिंधू नदीतून पाणी मिळत होतं
2. भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापार आणि करार रद्द केले आहेत . भारतीय माल पाकिस्तानमार्गे येत आहे, पण पाकिस्तानी माल भारतातून जाऊ शकत नाही. यामुळे पाकिस्तानचे कोट्यवधींचे नुकसान झालं आहे.
3. भारताने चिनाब नदीचे पाणीही रोखलं आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्येही खळबळ माजली आहे. पाकिस्तानातील नद्या आणि नाले कोरडे पडले आहेत. भारताच्या या कृतीला पाकिस्तानने वॅटर अटॅक असं नाव दिलं आहे.
4. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात राजनैतिक पद्धतींचा अवलंब केला. यामुळेच पाकिस्तानला आतापर्यंत कोणत्याही मोठ्या देशाकडून उघड पाठिंबा मिळालेला नाही. चीनने निश्चितच पाठिंबा दिला आहे, परंतु चीन कोणत्या प्रकारचा पाठिंबा देईल याबद्दल काहीही सांगितलेलं नाही.
5. भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घातली. यामुळे पाकिस्तान संतापला आहे. टरबूज, खरबूज, सिमेंट, सेंध मीठ, सुकामेवा, दगड, चुना, कापूस, स्टील आणि चष्म्यासाठीचे ऑप्टिक्स पाकिस्तानमधून भारतात आयात केले जातात.
6. भारताने पाकिस्तानच्या टपाल सेवेवर बंदी घातली. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. इतिहासात पहिल्यांदाच टपाल सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.
7. भारताने पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. पाकिस्तानी जहाज भारतीय सीमेवरून बांगलादेशला सामान पोहोचवत होते.
8. भारताने पाकिस्तानच्या सर्व लष्करी सल्लागारांना देशातून हाकलून लावलं आहे. भारताच्या या पावलामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी करणं कठीण झालं आहे.
9. भारताने झेलम नदीचे पाणी पाकिस्तानात सोडलं आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानातील मुझफ्फराबाद भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक आपली घरे सोडून पळून सुरक्षित स्थळी गेले आहेत.
10. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला एकटं पाडलं आहे. 5 मे रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानला पाठिंबा मिळाला नाही. उलट, सुरक्षा परिषदेच्या इतर सदस्यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले.
11. पकिस्तानला पहिल्यांदाच मुस्लिम देशांचा देखील पाठिंबा मिळालेला नाही. पहलगाममध्ये जेव्हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात होते. सौदीने या दहशतवादी हल्ल्याची तीव्र टीका केली.
12. भारताने नवी दिल्लीतील सर्व देशांच्या राजदूतांना बोलावून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांची माहिती दिली. याचा परिणाम असा झाला की, टीव्हीवरील वादविवादांपासून ते बंद खोलीतील बैठकांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर पाकिस्तान वादाच्या भोवऱ्यात अडकला.
13. भारताने पाकिस्तानला 14 दिवसांपर्यंत घबरवलं. ज्यामुळे पाकिस्तानच्या मार्केटची स्थिती आणखी बिकट झाली. तणावामुळे कराची स्टॉक एक्सचेंजच्या शेअर बाजारात घसरण सुरूच राहिली. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला.
14. भारताने पाकिस्तान सीमेवर असलेले सलाल आणि बाघलियार धरणे बंद केली. पाकिस्तानला या धरणातून पाणी मिळत होतं, जे पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी वापरले जात होतं.
15. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत.