मुंबई- अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर शरद पवारांना सोबत घ्यावेच लागेल, अशी अट भाजपने घातली असेल असे मत विधान सभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी (Leader of Opposition Vijay Wadettiwar) व्यक्त केले आहे. वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आहेत. त्यामुळे या भेटीला संभ्रम म्हणण्याचे काही कारण नाही. शरद पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. काही काळ धीरही धरला पाहिजे. मी या भेटीने संभ्रम निर्माण झाला असं म्हणणार नाही. या भेटीत कुणाची तरी गरज आहे. ही गरज जो भेटायला जातो त्याचीच आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
शरद पवार सोबत न आल्यास अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नच बघत रहावे लागेल, असे भाजपने कदाचित म्हटले असेल. हा सत्तेसाठी सुरु असलेला खटाटोप आहे. येथे विचारांना तिलांजली देण्यात आली आहे, विकासाला तिलांजली दिली आहे. येथे केवळ खुर्चीला महत्त्व दिल्याचे या घडामोडींमधून दिसत आहे, असेही ते म्हणाले
“तरच अजित पवार मुख्यमंत्री होतील..” : वडेट्टीवार
Breaking news
MAHARASHTRA
MAHARASHTRA
















